२९ वर्षांनंतर वीर-काजुर्ली पुलाच्या हालचालींना वेग
कापशी नदीवरील पाहणीमुळे ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या
संतोष कुळे
चिपळूण : तालुक्यातील वीर-देवपाट व गुहागर तालुक्यातील काजुलीं या दोन गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या हालचालींना वेग आला आहे. या पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन मंत्रालयस्तरावरून करण्यात आलेल्या सूचनांनुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रस्तावित ठिकाणी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य संजय जावळे यांच्यासह स्थानिक, मुंबईकर ग्रामस्थांनी मंत्रालय पातळीपर्यंत पाठपुरावा केल्याने पुलाच्या उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चिपळूण वीर-काजुर्ली गावांना जोडण्यासाठी कापशी नदीवर पूल उभारण्याची मागणी १९९९पासून करण्यात येत आहे. याबाबत २००० पासून पत्रव्यवहारही सुरू आहे. सध्या या दोन्ही गावांदरम्यान नदी ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. प्रस्तावित पुलामुळे हा प्रवास अधिक सुलभ होणार असून चिपळूण, गुहागर, संगमेश्वर तसेच रत्नागिरी तालुक्यांना आणि मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. प्रस्तावित कापशी नदीवरील पुलाची लांबी सुमारे १२० मीटर, तर उंची व रुंदी आवश्यकतेनुसार ठेवण्याचे नियोजन आहे. पुलासाठी दुपदरी रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार असून उंच पातळीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पावसाळ्यातील नदीच्या वाढत्या पाण्याचा वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
या पुलामुळे वीर, काजूर्ती परिसरातील ३५ पेक्षा अधिक गावांसह सुमारे २८ हजारांहून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. लोकसंख्येला थेट किंवा अप्रत्यक्ष चिपळूण-रत्नागिरी प्रवासासाठीही हा पर्यायी व महत्त्वाचा मार्गावरील दुवा ठरू शकतो. प्रस्तावित पूल अस्तित्वात आल्यास मुंबई-रत्नागिरी मार्गावरील प्रवासासाठीचा अतिरिक्त वळसा वाचण्यास मदत होणार आहे. या पुलामुळे परिसरातील पर्यटन, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि बाजारपेठेच्या दृष्टीने मोठी सुविधा निर्माण होणार आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
पुलाच्या मागणीसाठी पंचायत समिती संजय जावळे, ग्राम विकास मंडल अध्यक्ष दीपक पवार, परीक्षित पावसकर, विशाल वीरकर, जयंत वीरकर, काजुर्लीच पप्पू साळवी यांच्यासह वीर, पूर्वे, शिरंबे, वहाळ, पिलवली, तोंडली, अबिटगाव गावांच्या सहकार्यातून नेहमीच पाठपुरावा करण्यात आला.
सुमारे २९ वर्षांपूर्वीपासून पुलावी मागणी
कापशी नदीवरील बीर-काजुर्ली पूल झाल्यास या परिसराचा मोठा कायापालट होणार आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पाहणीमुळे प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तब्बल २९ वर्षांपासूनची वीर-काजुर्ली ग्रामस्यांची मागणी प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
संजय जावळे पंचायत समिती सदस्य, वीर

Comments
Post a Comment