बामणोली  डिंगणकरवाडीत 'श्री पोवारडेबाजी आरती संग्रह' प्रकाशित

मुंबई  मंडळाचा एक स्तुत्य उपक्रम



चिपळूण : श्री ओम पोवारडेश्वर उत्कर्ष मंडळ बामणोली डिंगणकरवाडी मुंबई व नवनिर्माण युवा मंडळ आणि नवतरुण मित्र मंडळ डिंगणकर यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई मंडळच्या वतीने श्री पोवारडेबाजी आरती संग्रह २०२६ चे प्रकाशन गणेशोत्सवात करण्यात आले. 

बामणोली डिंगणकरवाडी येथील सभागृहामध्ये नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी  मंडळाचे अध्यक्ष ॲड. संतोष भाई कुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.  ओम पोवारडेबाजी आरती संग्रह या   पुस्तकास  महत्त्वपूर्ण सहकार्य करणारे  दिलीप शिगवण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडीचे  पदाधिकारी आणि  मुंबई मंडळाचे पदाधिकारी या सगळ्यांच्या वतीने ओम पोवारडेबाजी आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुंबई मंडळाच्या वतीने करण्यात आले. 

 या कार्यक्रमाच्या वेळी बामणोली ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील  डिंगणकर  यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर स्थानिक मंडळाचे माजी सचिव  बाबुराव डिंगणकर यांनी सुद्धा या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मुंबई मंडळाचे कौतुक करत हा आरती संग्रह म्हणजे एक वाचनीय आणि भक्तीचा  ठेवा आहे असे नमूद केले.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीप शिगवण  यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत मला एक छोटीशी सेवा करण्याची संधी दिली  त्याबद्दल मुंबई मंडळाचे त्यांनी आभार व्यक्त केले.  त्यानंतर स्थानिक मंडळाचे अध्यक्ष ॲड संतोष भाई कुळे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुंबई मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.  असेच नवनवीन उपक्रम एकमेकांच्या साथीने केले तर निश्चितच एक चांगला आदर्श येणाऱ्या पिढी समोर उभा राहील.   आपल्या वाडीच्या सर्वांगीण विकासासाठी  मुंबई मंडळ आणि स्थानिक मंडळ या सर्वांनी एकत्र येऊन काम करू आणि एक आदर्श वाडी म्हणून नाव लौकिक करू.  लवकरच श्री पोवारडेश्वर  मंदिर एक तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ कसे होईल याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. 

 या कार्यक्रमाला स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष रघुनाथ गोरीवले, सचिव सुनील बोबले,  सहसचिव बाबुराव डिंगणकर,  खजिनदार तुकाराम डिंगणकर,  कृष्णा कुळे,  रामचंद्र बोबले, रवींद्र पावसकर, सुनील डिंगणकर, गणेश राऊत, तानाजी डिंगणकर हे  प्रमुख मान्यवर म्हणून  उपस्थित होते.  मुंबई मंडळाचे अध्यक्ष रोशन डिंगणकर,  सचिव रोहित पावसकर, कार्याध्यक्ष स्वप्निल बोबले,  उपखजिनदार रवींद्र गोरिवले,  सहसचिव कल्पेश कुळे,  राकेश पावसकर, नरेश घाणेकर, उमेश कुळे, शैलेश डिंगणकर, विश्वजित तांबिटकर, संतोष पावसकर, प्रवीण पवार,  सल्लागार अजय डिंगणकर,  प्रमोद पवार असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या आरती संग्रहासाठी विजय डिंगणकर यांनी संकल्पना मांडून  ती पूर्ण करण्यासाठी मोलाचे  सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. सर्व मुंबई मंडळाने कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय डिंगणकर यांनी केले तर सूत्रसंचालन संदेश कुळे यांनी केले.

Comments