महाड येथे १ ऑक्टोबर रोजी महार रेजिमेंट चा ८६ वा वर्धापन दिन
चिपळूण : यश सिद्धी माजी सैनिक संघ महाराष्ट्र राज्य चिपळूण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई यांच्या वतीने महाड रेजिमेंट यांचा ८६ व्या स्थापना दिवस गुरुवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन क्रांतीभूमी चवदार तळे महाड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल मुख्य राष्ट्रीय ट्रस्टी डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीच यश सिद्धी माजी सैनिक संघ महाराष्ट्र राज्य चिपळूण हे नेहमीच महार रेजिमेंट वर्धापन दिन साजरा करत असतात. या वर्षी हा ८६ वा रेजिंग डे आहे. हा कार्यक्रम महाड येथे क्रांतीभूमीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मान्यवर म्हणून रायगड जिल्हा माजी सैनिक प्रमुख कॅप्टन तुळशीराम सकपाळ, रायगड जिल्हा माजी सैनिक कॅप्टन मधुकर काळू जाधव, रायगड जिल्हा माजी सैनिक कॅप्टन तानजी साळवे, एपीआय सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई रोशन कांबळे, महाड येथील ॲड रमेश सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी ७ ते ९.३० वाजता महाड शहरातील महापुरुष व शहीद वीरांना अभिवादन, सकाळी १० वाजता मातृभूमी रक्षणार्थ शहिदांना मानवंदना, सकाळी १० वाजून २० मिनिटांनी दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण व पूजापाठ, सकाळी १०.२५ ते १०.४५ वाजता महार रेजिमेंट इतिहास क्लिप, सकाळी १०.४५ ते दुपारी १२ वाजता स्वागत व सत्कार, सकाळी दुपारी १२ ते १२.३० वाजता मान्यवरांचे मनोगत व शुभेच्छा, दुपारी १२.३० ते २ वाजता प्रमुख अतिथी यांचे मार्गदर्शन, दुपारी २ ते ३ वाजता कार्यक्रमाचा समारोप व सहभोजन असा नियोजन बद्ध कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती महाड, भारतीय बौद्ध महासभा महाड, चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षण समिती, भारतीय बौद्ध महासभा चिपळूण, प्रांताधिकारी महाड, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद महाड, पोलीस निरीक्षक महाड व तहसीलदार महाड असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्य समिती अध्यक्ष भाऊ लक्ष्मण पवार व मुंबई कमिटी आणि दोन्ही कमिटीतील सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तांबे आणि अशोक सावंत हे करणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यश सिद्धी माजी सैनिक संघ महाराष्ट्र राज्य चिपळूण रत्नागिरी रायगड व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment