"आपला कोपरा नवरतवाडी" यांच्या वतीने १७ रोजी स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा 

मुलांच्या पाठांतर क्षमतेला मिळणार चालना

  संतोष कुळे 

चिपळूण : गणेशोत्सवाचे  औचित्य साधून, 'आपला कोपरा, नवरतवाडी' या जनसंस्थेच्या वतीने वाडीतील विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, धार्मिक व आध्यात्मिक मूल्यांची जपणूक व्हावी आणि  त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्रथमच  गुरुवार १७ सप्टेंबर रोजी उदय टाणकर यांच्या निवासस्थानी दुपारी 'स्तोत्र व गणपती अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. 

आपला कोपरा नवरतवाडी यांच्या वतीने प्रथमच एक शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांच्या  सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामधील पाठांतर क्षमता उत्तम व्हावी यासाठी स्तोत्र व गणपती अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा होणार आहे. 

या स्पर्धेत १२ वर्षाखालील वयोगटातील मुलांसाठी स्तोत्र आणि श्लोक पाठांतर स्पर्धा होईल.  मुलांनी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि १० मनाचे श्लोक या तीन पैकी दोन विषयावर स्पर्धेत भाष्य करायचे आहे. यामध्ये प्रथम क्रमांक विजेता ५०१ रुपये, द्वितीय क्रमांक ३५१, तृतीय क्रमांक २५१, आणि उत्तेजनार्थ १०१ रुपये अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.

याच स्पर्धेत १२ ते २० वर्षाखालील मुलांसाठी गणपती अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा होईल. यात प्रथम क्रमांक विजेता १००१ रुपये, द्वितीय क्रमांक ७०१, तृतीय क्रमांक ५०१, आणि उत्तेजनार्थ ३०१ असे पारितोषिक आयोजकांकडून ठेवण्यात आले आहे.  स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर करण्यात येईल. ही स्पर्धा उदय टाणकर यांच्या निवासस्थानी असलेल्या मंडपात होईल. ही स्पर्धा म्हणजे आपल्याच गावातील मुलांना बुद्धिमत्तेचे धडे देणारा उपक्रम आहे. या स्पर्धेत मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुशांत नवरत यांनी केले आहे.

Comments