आबिटगाव दत्तवाडी येथे ४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक सोंगी जाखडी स्पर्धेचे आयोजन
सेवानिवृत्त कार्यक्रमात होणार जाखडी स्पर्धा
चिपळूण: तालुक्यातील आबिटगाव दत्तवाडी येथे श्रीमती स्वाती बाबाराम येलोंडे यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमित्त दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पारंपरिक सोंगी जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आबीटगाव येथील पूर्वाश्रमीची सुधा राजाराम भागडे (माई) आणि आताची स्वाती बाबाराम येलोंडे यांनी शिक्षिका म्हणून उत्तम कामकाज केले. त्यांनी शैक्षणिक सेवा केल्यानंतर त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेचे एका सोहळ्यात रूपांतर करून भागडे परिवाराने सेवानिवृत्त कार्यक्रमाचे आयोजन करून दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पारंपरिक सोंगी जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या सहा नृत्य संचाना प्रवेश दिला जाईल. प्रवेश फी ७०० रुपये असून प्रथम विजेत्याला रोख रक्कम १५ हजार ५५५ रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ११ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक विजेत्याला ७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.
या स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ही स्पर्धा आबीटगाव दत्तवाडी येथे होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संजय भागडे ९९२१५८१०३४ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment