वाघिवरे येथील निर्मला बाबाजी कदम यांचे दुःखद निधन 



चिपळूण : तालुक्यातील  वाघिवरे येथील  श्री. व्याघ्रेश्वर सेवा मंडळाचे माजी सचिव आणि शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते  दिलीप बाबाजी कदम आणि त्यांचे बंधू   अशोक बाबाजी कदम , शिरीष बाबाजी कदम यांच्या मातोश्री  कै. सौ. निर्मला बाबाजी कदम  यांचे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ८० वर्षाच्या होत्या.

वाघिवरे कदमवाडी येथील निर्मला कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा चालविला. सर्व सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. प्रत्येकाच्या सुख दुःखात त्या सामील होऊन  त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या पुढे असायच्या.  त्यांनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले. त्यामुळे मुलेही सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना मुलानी मुंबईत नेले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळे होते. त्यामुळे निर्मला कदम यांचे निधन मनाला चटका लावून गेले. त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे स्नेह संबंध होते. त्यांच्या अचानक जाण्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी,  सुना, जावई,  नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी नेरूळ पश्चिम येते करण्यात आला. मात्र, त्यांचे कार्य विधी वाघिवरे कदमवाडी येथे होईल.

Comments