स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय स्तरावरील OHS&E उत्कृष्टता पुरस्कार 

प्रदान

उद्योजक निलेश चव्हाण यांच्या कामगिरीने कोकणचा गौरव


चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने येथील सुपुत्र आणि सध्या पुणे येथे व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असलेले,  बांधकाम क्षेत्रात सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य देत उत्कृष्ट कामगिरी करणारे कोकणचे सुपूत्र  निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीला जागतिक सुरक्षा संघटनेच्या (World Safety Organization) वतीने राष्ट्रीय स्तरावरील OHS&E उत्कृष्टता पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रातील OH&S उत्कृष्टतेसाठी कंपनीला ३ स्टार रेटिंग, रौप्य चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


जागतिक सुरक्षा संघटनेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने उद्योजक नीलेश चव्हाण यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण कोकणात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. नवरात्र उत्सव सुरू असतानाच हा पुरस्कार मिळाल्याने मार्गताम्हाणे गावची देवी पद्मावती हिनेच त्यांच्यावर यशाच्या रंगाची उधळण केल्याची भावना व्यक्त होत आहे.

 गुजरात येथील हिंडाल्को ग्रीनफिल्ड ई-कचरा आणि दुय्यम तांबे पुनर्वापर प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान आरोग्य, व्यावसायिक सुरक्षितता आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. सुरक्षितता व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव मूल्यांकन वर्ष २०२५ मधील कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कामगारांची सुरक्षितता, अपघात प्रतिबंध, जोखीम व्यवस्थापन, कार्यस्थळावरील शिस्त आणि पर्यावरण संरक्षण या बाबींना प्राधान्य देत स्कॉन प्रोजेक्ट्सने प्रभावी सुरक्षितता व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. सुरक्षिततेला केवळ नियमांपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन कार्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनविण्यावर कंपनीचा भर आहे. गुणवत्ता, सुरक्षितता आणि गतीचा समन्वय ‘सुरक्षितता प्रथम, गुणवत्ता प्रथम आणि गती प्रथम’ या तत्त्वांवर कार्यरत असलेल्या स्कॉन प्रोजेक्ट्सने प्रकल्पांची नियोजित वेळेत पूर्तता करताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. 

 निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार व्यवस्थापन प्रणाली कंपनीकडून ISO 45001:2018 (OH&SMS), ISO 9001:2015(QMS), आणि ISO 14001:2015 (EMS) या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन मानकांचा अवलंब करण्यात येत आहे. गुणवत्ता नियंत्रण, व्यावसायिक आरोग्य व सुरक्षितता तसेच पर्यावरण संरक्षणासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कंपनीच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा स्कॉन प्रोजेक्ट्सला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान कंपनीच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि पर्यावरण व्यवस्थापनातील सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेली ही मान्यता औद्योगिक बांधकाम क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Comments