बामणोली येथील श्री  चंडकाई वाघजाई देवीच्या नवरात्रोत्सवाला ११ पासून प्रारंभ


चिपळूण : तालुक्यातील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर बामणोली या देवस्थानाच्या नवरात्र उत्सवाला दिनांक ११ ऑक्टोबर पासून प्रारंभ  होत आहे. यावेळी नवरात्रीमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  रविवार दिनांक ११ रोजी देवाची पेटी आणण्यासाठी श्री. सचिन ओक यांचे निवास स्थानी दुपारी सर्व मानकरी गावकरी उपस्थित राहतील. त्यानंतर देवळात देवाला रूप लावणे आणि देवाची घटस्थापना करण्यात येईल.     त्यानंतर ट्रस्टच्या नियोजनानुसार  प्रथम देवीच्या सेवेची संधी सोमवार दिनांक १२ ते १३  रोजी नवतरुण मित्र मंडळ डिंगणकर वाडी यांना सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. 

बुधवार दि. १४ ते १५ रोजी   श्री जुगाई देवी मंडळ पुर्व वणेवाडी यांना सेवा संधी मिळणार आहे. त्यानंतर शुक्रवार १६ ते १७ रोजी  तरुण उत्कर्ष मंडळ पश्चिम वणेवाडी,   रविवार दि. १८ ते १९ रोजी  श्री मुजेश्वर मित्र मंडळ गवळवाडी यांना देवीची सेवा करण्याचा मान मिळणार आहे. त्यानंतर दि. २० रोजी दसरा असून या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी दुपारपर्यंत मानकरी यांना सेवेची संधी मिळणार आहे.

 दररोज रात्री ७ ते ७.३० यावेळी देवीची महाआरती होईल. त्यानंतर भजन आणि रात्री १० वाजल्यानंतर सामूहिक दांडिया नृत्याचा सदाबहार कार्यक्रम होईल. दिनांक २० रोजी देवीच्या नवरात्र उत्सवाची सांगता होताना सोने लुटणे हा पारंपरिक कार्यक्रम होईल. या नवरात्र उत्सवाला सर्व भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून मातेचे दर्शन घ्यावे, असे देवस्थान समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Comments