लोकाभिमुख नेतृत्व आणि विकासात्मक कामांची पावती
आबिटगावचे सरपंच सुहास भागडे यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव
चिपळूण : चिपळूण ग्रामीण विकास आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण तालुक्यातील आबिटगावचे सरपंच सुहास भागडे यांना आदर्श सरपंच सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असून, गावातील - मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांना गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा हेतू, प्राधान्य देणे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, यामध्ये सरपंचांची भूमिका महत्त्वाची असते. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्कारा मागील प्रमुख उद्देश होता.
आबिटगावचे सरपंच सुहास भागडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुहास भागडे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून लोकांच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे.
या पुरस्कारामुळे ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या सन्मान सोहळ्यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सरपंच सुहास भागडे यांना पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे वहाळ विभागातून त्यांच्या वरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment