यशवंत विद्यालय धामणंदचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश 




खेड. : पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय धामणंद येथील 14 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. 

 तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा खेड येथील क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत यशवंत विद्यालय धामणंद येथील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.मनिष तांबे अंडर १९ पंधराशे मीटर धावणे द्वितीय सोहम मिस्त्री अंडर १९ गोळा फेक द्वितीय सुजल शिर्के अंडर १९ भालाफेक प्रथम प्रणय जोंधळे अंडर १७ भालाफेक तृतीय सुशांत पालांडे अंडर १९ ट्रिपल जंप द्वितीय श्रवण  म्हापदी लांब उडी द्वितीय मनीष तांबे अंडर १९ 100 मीटर हर्डल्स प्रथम मनीष तांबे अंडर १९ लांब उडी तृतीय प्रमिला जानकर अंडर १९ लांब उडी द्वितीय सोनाली शिंदे अंडर १७ , 800 मीटर तृतीय श्रेयस उतेकर अंडर १७ भालाफेक प्रथम आदित्य गोरे अंडर १७ हॅमर थ्रो द्वितीय ऋग्वेद म्हापदी अंडर १९ हेमर्थ्रो द्वितीय या विद्यार्थ्यांना प्राध्यापक भांदिगरे आर.एस.अभिजित भोये सर यांनी मार्गदर्शन केले. 

पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था धामणंद अध्यक्ष अनंतरावजी पालांडे सचिव संदीप म्हापदी तसेच सर्व संचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी पाटील सर,पालक ग्रामस्थ क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले तसेच माजी मुख्याध्यापक विजय देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments