पाणी अडवा, पाणी जिरवा'चा यशस्वी पॅटर्न

  पिलवली तर्फे वेळंब ग्रामपंचायतीने लोकसहभागातून बांधले  १० बंधारे


चिपळूण : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटावर यशस्वी मात करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील पिलवली तर्फे वेळंब ग्रामपंचायतीने 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या उपक्रमांतर्गत एक आदर्श पायंडा पाडला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावात तब्बल १० बंधारे बांधण्यात आले असून, या जनआंदोलनामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी तालुक्यात बंधारे मिशन सुरू आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत  पिलवली तर्फे वेळंब यांनी लोकसहभागातून १० बंधारे बांधले. यामध्ये गावातील विठ्ठलवाडी यांनी  २ बंधारे बांधले, बौद्धवाडी २, गावानवाडी २, मधलीवाडी २, चिंचवाडी १ आणि खोलवाडी १ असे एकूण १० बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे बांधण्यासाठी सरपंच दिनेश पुनवत, सदस्या सौ शालिनी गोमाने, सौ रोहिणी गोमाणे, ग्रामपंचायत अधिकारी पुष्पा खांबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंत गोमाणे, कृषी सहाय्यक विजय साळुंखे, पशुवैद्यकीय दवाखाना वहाळ येथील पर्यवेक्षक सौ.ज्योत्स्ना गोंडचर, बचत गट सीआरपी दिव्यांका वणगे आणि शाळेतील शिक्षक व विद्यार्थी बंधारे बांधण्याची उपस्थित होते. सर्वांच्या योगदानातून हे बंधारे बांधण्यात आले.

Comments